मुंबई - भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध तर ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया खेळणार आहे. याच काळात भारताचा दुसरा सामना श्रीलंकेचा दौरा करणार आहे. पण या दौऱ्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. कारण श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता भारतीय संघ आणखी एका देशाचा दौरा करणार असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २०२२ वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी, ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान, उभय संघात २०१९ मध्ये भारतात कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. यात कोलकातामध्ये खेळवण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्याचा समावेश होता. या मालिकेनंतर अद्याप उभय संघात कोणतीही मालिका झालेली नाही. याचे प्रमुख कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.