मुंबई - इंग्लंडने लीड्स कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव केला. या दारूण पराभवानंतर विराट कोहलीने आमची फलंदाजी खोलपर्यंत नसल्याचे म्हटलं होतं. यावर भारताच्या माजी दिग्गजाने त्याला एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा सल्ला दिल्ला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. अशात भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर दिलीप वेंगसकर यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. वेंगसकर याच्या सल्ल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी कमी होऊ शकतात.
दिलीप वेंगसकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, भारतीय संघाने फलंदाजी लाईन अप अधिक मजबूत करण्याची गरज आहे. ज्यात हनुमा विहारी ऐवजी सुर्यकुमार यादवला संघात स्थान दिले पाहिजे. भारताने एक गोलंदाज कमी करून सहा फलंदाजांसह मैदानात उतरले पाहिजे.
दिलीप वेंगसकरच्या मते, सुर्यकुमार यादवमध्ये ती प्रतिभा आहे. ज्याचा भारतीय संघाला जास्त फायदा होऊ शकतो.