आग्रा: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने बुधवारी रात्री दिल्लीच्या जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली. दीपक आणि जया ( Deepak Chahar Jaya Bhardwaj Wedding ) यांचे लग्न फतेहाबाद रोडवर असलेल्या द रॉयल ग्रॅन्डर थीमवर असलेल्या एका स्टार हॉटेलमध्ये पार पडले. याआधी मंगळवारपासून मेहंदी, हळदी, संगीताचे विधी पार पडले.
बुधवारी रात्री 7.45 च्या सुमारास दीपक चहर घोडीवर बसला ( Deepak Chahar Wedding ) आणि हॉटेलच्या आवारातच बांके बिहारीलालचा जल्लोष झाला. दीपक चहरचे वडील आणि प्रशिक्षक लोकेंद्र सिंह चहर, काका देशराज चहर, टीम इंडियाचा सदस्य आणि चुलत भाऊ राहुल चहर, बहीण मालतीसह, विशेष पाहुण्यांनी जबरदस्त नृत्य केले.
मिरवणुकीनंतर दीपक चहर आणि जया दोघेही स्टेजवर पोहोचले, जिथे जयमालाचा कार्यक्रम झाला. दीपक आणि जया यांनी जवळपास दीड तास मंचावर पाहुणे आणि नातेवाईकांचे आशीर्वाद घेतले. यानंतर, दीपकने जयासोबत सात फेरे घेतले.