अहमदाबाद: भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका (India v West Indies ODI series) खेळली जाणार आहे. या मालिकेला 6 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. तसेच या मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळले जाणार आहे. तत्पुर्वी या मालिकेसाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. सर्व खेळाडूंनी रविवार आणि सोमवारच्या दरम्यान जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात प्रवेश केला आहे. तसेच हे सर्व खेळाडू तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली.
या मालिकेत रोहित शर्मा भारतीय मर्यादीत षटकांच्या सामन्याचा नियमित कर्णधार (Indian team led by Rohit Sharma) म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरेल. तो मागील दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मुकला होता. अहमदाबाद येते जातानाचे भारतीय खेळाडूंनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.