नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. त्याआधी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांची न्यू जर्सी मंगळवारी 7 मार्च रोजी लॉन्च केली आहे. या जर्सीच्या लाँचिंग वेळी संघाचे मालक संजीव गोयंका, मार्गदर्शक गौतम गंभीर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल उपस्थित होते. त्यांच्याशिवाय दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ही नवीन जर्सी जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी त्याचा रंग निळा असून या जर्सीवर केशरी-हिरवे पट्टेही आहेत. या जर्सीला हा निळा रंग का देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया.
ट्विटर हँडलवरून दोन पोस्ट शेअर :लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये लखनऊ फ्रँचायझीची नवीन जर्सी दिसत आहे. जी निळ्या रंगाची आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये बीसीसीआय अध्यक्ष जय शाह, गौतम गंभीर, केएल राहुल आणि संघाचे मालक संजीव गोएंका स्टेजवर जर्सी लाँच करताना दिसत होते. आयपीएल फ्रँचायझीनुसार, या जर्सीला निळा रंग देण्यात आला आहे. कारण यामुळे संघातील लोकांना प्रेरणा मिळेल. असेही मानले जाते की टीम इंडियाच्या जर्सीचा रंग फक्त निळा आहे आणि भारतीय क्रिकेटचा हा रंग संपूर्ण देशाला जोडतो. याशिवाय या जर्सीतील केशरी पट्टे संघाच्या ताकदीचे आणि धैर्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले आहे.