हैदराबाद:सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम रोमांचक स्थितीत आहे. कारण प्रत्येक संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. तसेच रविवारी (8 मे) रोजी, आयपीएल 2022 च्या डबल हेडर सामन्यातील पहिल्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी दुसऱ्या सामन्यात शानदार विजय नोंदवला. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा 67 धावांनी पराभव ( RCB beat Sunrisers Hyderabad ) केला. त्याचबरोबर सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव ( CSK beat Delhi Capitals ) केला. या विजयासह सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
रविवारी मिळवलेल्या विजयानंतर आरसीबीचे 14 गुण झाले आहेत. तसेच आरसीबीने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रनरेट देखील सुधारला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) आतापर्यंत 11 सामने खेळले असून चार जिंकले आहेत. सीएसकेचे आठ गुण आहेत. गुणतालिकेत तो आठव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल 2022 ची लेटेस्ट गुणतालिका दरम्यान शनिवारी (7 मे) लखनौ सुपर जायंट्सने ( Lucknow Super Giants ) देखील नेत्रदीपक विजयाची नोंद केली आणि गुजरात टायटन्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. केएल राहुलच्या संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातनेही 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स संघ तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने अकरा सामन्यात सात विजयासह 14 गुणांची कमाई केली आहे.
मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्जनेही ( Punjab Kings ) आतापर्यंत 11 सामन्यांत 5 विजय नोंदवले आहेत. 10 गुणांसह पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. सीएसके आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स 11 सामन्यांत चार विजय मिळवून नवव्या क्रमांकावर आहे. पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स या मोसमातील सर्वात खराब कामगिरीसह शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईला 10 पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे.
हेही वाचा -IPL 2022 DC vs CSK : आम्ही अजून प्लेऑफमध्ये जाऊ शकतो फक्त 'हे' करावे लागेल - रिषभ पंतचे वक्तव्य