हैदराबाद :आज देशभरात सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे लोकांना होळीचा सण साजरा करता आला नव्हता. कारण सरकारने बऱ्याच गोष्टींवर निर्बंध घातले होते. त्यामुळे हा सण आणि इतर सण साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा ( Celebrate Holi ) केला जात आहे. तसेच या होळीच्या सणानिमित्ताने अनेक क्रिकेपटूने आपल्या चाहत्यांना आणि देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एकीकडे कुटुंबातील लोक मिळून होळीचा सण साजरा करत आहेत. त्याचबरोबर सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आता विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने ( Wicketkeeper Rishabh Pant ) आपल्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंसोबत होळीचा सण साजरा केला आहे. त्याचबरोबर आपल्या संघ सहकाऱ्यांच्या सोबत रंगात रंगलेल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ( Master blaster Sachin Tendulkar ) देखील ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.