महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Singer KK Passes Away : प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनावर क्रिकेट जगतातील 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक - विराट कोहली

प्रसिद्ध गायक केके ( Famous Singer KK ) यांचा कोलकात्यातील म्युझिक लाइव्ह शो झाल्यानंतर काल रात्री अचानक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलीवूड बरोबरच क्रिकेट विश्वाने देखील शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटमधील आजी माजी दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केके यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Singer KK
Singer KK

By

Published : Jun 1, 2022, 5:10 PM IST

हैदराबाद : प्रसिद्ध गायक केके यांनी मंगळवारी रात्री या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53व्या वर्षी त्यांचे निधन झाले ( Singer KK Passes Away ) आहे. तो कोलकात्यात लाइव्ह शो करत होता, शो संपल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. प्रसिद्ध गायकाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही बातमी रात्री उशिरा समोर येताच जो कोणी ऐकला तो थक्क झाला. बॉलीवूडपासून ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत सर्वजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

केकेच्या निधनाने केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट विश्वालाही धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला ( Indian cricketers react kk deaths ) आहे. चला जाणून घेऊया केके यांच्या निधनानंतर कोण काय म्हणाले?

केकेच्या निधनावर क्रिकेट जगताने व्यक्त केला शोक -

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने ( Former cricketer VVS Laxman ) लिहिले, "महान गायक केके यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. तो त्यांच्या संगीताद्वारे नेहमीच आमच्यासोबत असेल. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना."

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ( Former opener Virender Sehwag ) लिहिले, "केकेच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले. यावरून आयुष्य किती अनिश्चित आहे, हे दिसून येते. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना आहे."

दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाने ( Former cricketer Suresh Raina ) लिहिले, "मला खूप मोठा धक्का बसला आहे. हे आमच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे. तुमची गाणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुम्ही एक दिग्गज आहात. केके तुम्ही खूप लवकर गेला आहात. तुमच्या प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो."

भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवनने ( Opener Shikhar Dhawan ) सुद्धा केकेच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ट्विट करताना लिहले आहे, संगीतासह इतका सुंदर आवाज ज्याने आम्हा सर्वांना भावूक केले. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या संवेदना.

भारतीय क्रिकेट संघाता माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former captain Virat Kohli ) देखील केकेच्या निधनांतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो ट्विट करताना म्हणाला, आमच्या काळातील एक दमदार गायक अचानक हरवला. त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या लोकांप्रती शोक व्यक्त करतो.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपट्टू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने ( Former cricketer Akash Chopra ) देखील केकेच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आकाश चोप्रा ट्विट करत म्हणाले, केके यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. पल...याद आएंगे वो पल. हे इतके भयानक वर्ष गेले, बरेच चांगले लोक खूप लवकर गेले. तुमच्या आत्म्यास शांती मिळू. तुमच्या गाण्यांद्वारे तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल...

हेही वाचा -IPL 2022 : आयपीएल स्पर्धेतील 'या' खेळाडूंचे भविष्य आहे सोनेरी

ABOUT THE AUTHOR

...view details