चंदीगढ - आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना गिरकी घ्यायला भाग पाडणारा भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे घेत आहे. युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबतच्या डान्सचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत असून लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.
युजवेंद्र चहल घेतोय पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे, खास व्हिडीओ शेअर - युजवेंद्र चहलचा पत्नीसोबत डान्स
भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे घेत आहे. चहलने डान्सचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत असून लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर असली तरी ती उत्तम डान्सर आहे.
शेअर केलेल्या व्हिडिमध्ये युजवेंद्र आणि धनश्री 13 सेकंदाच्या म्युझिक व्हिडिओवर थिरकताना दिसत आहेत. द फुटवर्क कपल, सांगा कोणी चांगले होते?, असेही त्याने म्हटलं आहे. यावर गौरव कपूरने 'विद्यार्थी हळूहळू मास्टर होत आहे' अशी कमेंट केली आहे.
युजवेंद्र आणि धनश्री सप्टेंबर 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. धनश्री ही एक डॉक्टर आहे. परंतु, तिला डान्सची प्रचंड आवड आहे. ती नेहमची निरनिराळे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तीच्या युट्यूब चॅनलच्या सब्सक्राइबरची संख्या 20 लाखांच्या घरात आहे. याशिवाय त्यांच्या इंन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 19 लाख इतकी आहे.