हैदराबाद : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 2022-23 साठी देशांतर्गत हंगाम जाहीर केला. यादरम्यान न्यूझीलंड भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंड यांचे यजमानपद भूषवणार आहे. घरच्या हंगामाची सुरुवात बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध तिरंगी मालिकेने होईल, जी टीम 2022 च्या टी20 विश्वचषकाची ( T20 World Cup ) तयारी करत असताना महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर भारताविरुद्ध ( IND vs NZ Series ) होणारी टी-20 आणि वनडे मालिका टी20 विश्वचषकाच्या आयोजनानंतर खेळली जाणार आहे. या मालिकेला 18 नोव्हेंबर प्रारंभ होणार आहे.
यादरम्यान, न्यूझीलंड संघ पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे ( India vs New Zealand Series ) यजमानपद भूषवणार आहे. भारतीय संघ किवीविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 18 नोव्हेंबरपासून टी-20 सामन्याने होणार आहे. 13 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होणार आहे. गेल्या वर्षी किवी संघाने विश्वचषकानंतर लगेचच टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. ही मालिका 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंडला घरच्या मैदानावर इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे, पण त्याआधी हा संघ पाकिस्तान आणि भारताचा दौरा करणार आहे. इंग्लंड मालिकेनंतर किवी संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात दोन कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी बांगलादेशचे तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने आयोजित करेल.