वॉर्सेस्टर - भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. कर्णधार मिताली राजने या सामन्यात नाबाद ७५ धावा केल्या. तिने अखेरच्या षटकात चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय संघावरिल क्लिन स्वीपची नामुष्की टाळली. अखेरच्या षटकादरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये कसे वातावरण होते. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला. यामुळे हा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने संघासाठी ४९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतक झळकावले.
भारतीय संघाला विजयासाठी ७ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. तेव्हा मैदानात मिताली राजसोबत स्नेह राणा फलंदाजी करत होती. ४६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सेट फलंदाज स्नेह राणा बाद झाली. तेव्हा मिताली राजची साथ देण्यासाठी झूलन गोस्वामी मैदानात उतरली. ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना मिताली स्ट्राईकवर होती. पहिल्या चेंडूवर मितालीला एक धाव मिळाली आणि गोस्वामी स्ट्राईकवर गेली.