नवी दिल्ली:2025 मध्ये भारत महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार ( India Host Womens ODI World Cup 2025 )आहे. कारण मंगळवारी बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत बीसीसीआयने मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( International Cricket Council ) या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे देश एका दशकाहून अधिक काळानंतर पुन्हा यजमानपद भूषवणार आहे.
महिलांचा एकदिवसीय विश्वचषक शेवटचा 2013 मध्ये भारतात आयोजित केला गेला होता. या विश्वचषकात मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा 114 धावांनी पराभव करून चॅम्पियन बनला होता. इतर तीन आयसीसी महिला स्पर्धांच्या यजमानांचीही आज घोषणा करण्यात आली. 2024 टी-ट्वेंटी विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार ( T20 World Cup 2024 in Bangladesh ) आहे. 2026 चा टी-ट्वेंटी विश्वचषक इंग्लंडमध्ये ( T20 World Cup 2026 in England ) होणार आहे.