महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Captain KL Rahul केएल राहुलला आपल्या पहिल्या विजयाची आस तर शिखर धवन आहे यशस्वी कर्णधार - क्रिकेटच्या मराठी न्यूज

केएल राहुलने Captain KL Rahul आतापर्यंत ज्या चार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे नेतृत्व केले, त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर धवनने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी संघाने पाच सामने जिंकले आहेत.

KL Rahul
केएल राहुल

By

Published : Aug 12, 2022, 5:42 PM IST

Updated : Aug 13, 2022, 12:21 PM IST

नवी दिल्लीकेएल राहुलला तंदुरुस्त झाल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली KL Rahul captain for Zimbabwe tour आहे. तरी तो अजूनही त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. तर शिखर धवन हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, ज्याला या दौऱ्यात आधी संघाचे नेतृत्व करावे लागले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने रोहित शर्मासह राहुलची तिन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदी निवड केली आहे. याच कारणामुळे तो तंदुरुस्त झाल्यावर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी धवनच्या जागी कर्णधारपद देण्यात आले.

राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला विजयाची आस

पण, राहुलच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या चारही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये एक कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, धवनने Captain Shikhar Dhawan सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यापैकी संघाने पाच सामने जिंकले आहेत. याशिवाय धवनने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्येही कर्णधारपद भूषवले आहे ज्यात एक विजय आणि दोन पराभवांचा विक्रम आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये धवनने पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातही तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करताना श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होची. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ 1-2 असा पराभूत झाला होता.

यावर्षी जानेवारीत झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलने प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात तत्कालीन कर्णधार विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच कर्णधारपद मिळाले, पण भारताने हा सामना सात विकेटने गमावला. राहुलने यावर्षी फेब्रुवारीनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळणार होता, पण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने तो खेळू शकला नाही.

हेही वाचा -Legends League Cricket लिजेंड्स लीग क्रिकेटची सुरुवात ईडन गार्डन्सवरील एका खास सामन्याने होणार

Last Updated : Aug 13, 2022, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details