हैदराबाद : सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies ODI series) यांच्यात नुकतीच वनडे मालिका पार पडली आहे. आता या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका कोलकाता येथे पार पडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कोलकात्यात दाखल झाला आहे.
शनिवारी आणि रविवारी झालेल्या आयपीएल लिलाव 2022 (IPL Auction 2022) नंतर अधिकत्तर खेळाडूंचे मलोबल वाढले आहे. कारण जास्तीत जास्त खेळाडूंना लिलावात चांगली बोली लागली आहे, त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) भारतीय संघ कोलकात्यात पोहचल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खेळाडू अहमदाबाद पासून कोलकातापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेत काहींनी हे ट्विट रिट्विट केले आहे.
दरम्यान भारतीय संघाने वेस्ट इंडिजला तीन सामन्याच्यां वनडे मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला होता. आता दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 16 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने कोलकाता ईडन्स गार्डनवर खेळला जाणार आहे.