नवी दिल्ली: अष्टपैलू अक्षर पटेलच्या ( All-rounder Axar Patel ) 35 चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 64 धावांच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजचा रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन चेंडू आणि दोन गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला वनडे तीन धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर भारतीय संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग 12 वा मालिका विजय ( India 12th consecutive series win ) आहे. यासह टीम इंडियाने सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तान संघाने सलग 11 वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने 2007 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही.