अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने धावांनी 44 विजय मिळवत मालिका आपल्या नावी केली. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 237 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेला वेस्ट इंडिज संघ 46 षटकांत 193 धावा करून सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकत मालिका देखील जिंकली. आता या मालिकेत भारतीय संघ 2-0 ने (India leads 2-0) अशा विजयी आघाडीवर आहे.
केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवची महत्वपूर्ण भागीदारी -
तत्पुर्वी भारतीय वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाला आमंत्रित करण्यात आले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघांची सुरुवात खराब (Bad start for Indian team) झाली. भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि रिषभ अनुक्रमे 5 आणि 18 धावा करुन स्वस्तात परतले. त्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीने निराश केले. तो 18 धावा काढून तंबूत परतला. या पडझडीमुळे भारताची अवस्था 15 षटकांत नंतर 3 बाद 47 अशी झाली होती.दरम्यान उपकर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर केएल राहुल 49 आणि सुर्यकुमार यादव 64 धावा (Suryakumar Yadav 64 runs) काढून बाद झाले. तसेच वाशिंग्टन सुंदर आणि दीपक हुड्डा यांनी अनुक्रमे 24 आणि 29 धावांचे योगदान दिले.
या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना खास अशी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 237 धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि ऑडियन स्मिथ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याचबरोबर रोच, होल्डर, हुसेन आणि अॅलेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. वेस्ट इंडिज संघाला भारताकडून 238 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरवात खास अशी झाली नाही. या संघाने आपली पहिली आणि दुसरी विकेट अनुक्रमे 32 आणि 38 धावांवर गमावली.
भारतीय गोलंदाजांचे दमदार कामगिरी -
ज्यामध्ये ब्रॅडन किंग 18 आणि डॅरेन ब्राव्हो 1 धाव काढून बाद झाले. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाने ठराविक अंतराने सातत्याने विकेट्स गमावल्या. या संघाकडून सर्वाधिक धावा शमार्ह ब्रूक्सने केल्या. त्याने 64 चेंडूत 44 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अकील हुसैन 34, शाई होप 27 आणि ऑडियन स्मिथने 24 धावांचे योगदान दिले. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 46 षटकांत 193 धावा करून सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 44 धावांनी जिंकत मालिका आपल्या खिश्यात घातली.भारताकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या (Most Wickets Taken by Prasiddha Krishna). त्याने 12 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दूल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, चहल, सुंदर आणि हुड्डा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा :Icc Odi Rankings : आयसीसीची वनडे रँकिंग जाहीर ; बाबर पहिल्या तर विराट रोहित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम