मोहाली - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात ( IND Vs SL 1st Test Match ) केली. दिवसाअखेर श्रीलंकेची चार बाद 108 धावा अशी स्थिती होती. त्यामुळे भारतीय संघाची सामन्यावर पकड कायम राहिली आहे.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 बाद 357 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने रविंद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार रोहित शर्माने चहापाणापूर्वीच आपला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला.
त्यानंतर भारतीय संघाने दिलेले लक्ष गाठण्यासाठी श्रीलंकेचे फलंदाज दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरु थिरिमाने मैदानात उतरले. पण, आर. अश्विनच्या गोलंदाजीपुढे लाहिरु थिरिमाने 17 धावांवर बाद झाला. तर, दिमुथ करुणारत्नेला जाडेजाने 28 धावांत तंबूत माघारी पाठवले. 33 व्या षटकांत अँजेलो मॅथ्यूज 22 धावांवर बाद झाला. तर, आर. अश्विनच्या चेंडूवर धनंजया सिल्वा फक्त एक धावा करुन बाद झाला. त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंकन फलंदाजांची कामगिरी निराशजनक राहिली आहे. श्रीलंकेचा संघ 466 धावांनी पिछाडीवर आहे.