तिरुवनंतपुरम :भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला आहे. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी वनडेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडचा 290 धावांनी पराभव केला होता. आता एकदिवसीय सामन्यात 300 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा भारत पहिला देश बनला आहे.
शुभमन गिल आणि विराट कोहलीचे शतक : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. शुभमनने 97 चेंडूत 116 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कोहलीने 110 चेंडूत 166 धावा करून नाबाद राहिला. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ 22 षटकांत 73 धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून केवळ तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. नुवानिडू फर्नांडोने 19, कसून राजिताने 13 आणि दासुन शनाकाने 11 धावा केल्या. या विजयासह भारताने श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना चार विकेटने जिंकला.
संक्षिप्त धावफलक :
भारत -50 षटकांत 390/5 (विराट कोहली नाबाद 166, शुभमन गिल 116; कसून रजिथा 2/81).
श्रीलंका -22 षटकांत सर्वबाद 73 (नुवानिडू फर्नांडो 19; मोहम्मद सिराज 4/32)
भारत :
- रोहित शर्मा, झेलबाद अविष्का फर्नांडो, गोलंदाजी सी करुणारत्ने, 42
- शुभमन गिल, रजिथा, 116
- विराट कोहली, नाबाद 166
- श्रेयस अय्यर, झेलबाद धनंजया डी सिल्वा, गोलंदाजी लाहिरु कुमारा, 38
- केएल राहुल, झेलबाद डी वेललागे, गोलंदाजी लाहिरू कुमारा, 7
- सूर्यकुमार यादव, झेलबाद अविष्का फर्नांडो, गोलंदाजी रजिथा, 4
- अक्षर पटेल, नाबाद 2
एक्स्ट्रा - (lb-10, w-5) 15
एकूण - 50 षटकांत 390/5
विकेट - 95-1, 226-2, 334-3, 364-4, 370-5