मोहाली :भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात पहिला शुक्रवार (4 मार्च) पासून पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पंजाब क्रिकेट असोसियनच्या आय एस बिंद्रा मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 85 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 357 धावसंख्या उभारली.
विराटच्या आठ हजार धावा पूर्ण तर रिषभचे हुकले शतक -
भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे. या सामन्यात विराट कोहली 45 धावांची खेळी करताना आपल्या आठ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावा भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक धावा ( Rishabh Pant highest score ) केल्या. त्याने आपल्या खेळीत 97 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांच्या आणि 4 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. त्याचबरोबर फक्त चार धावांनी त्याचे शतक हुकले.