कोलंबो Ind Vs SL :आशिया चषकाच्या सुपर ४ टप्प्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या. प्रत्युतरात श्रीलंका ४१.३ षटकांत १७२ धावाचं करू शकला. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं ४३ धावा देत ४ विकेट घेतल्या. तर बुमराह आणि जडेजानं २-२ बळी घेतले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालेजनं ४६ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या.
भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने आशिया कप २०२३च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकात २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत १७२ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. राहुलने ३९ आणि किशनने ३३ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या डावात ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक ४२ धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने ४१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताच्या सर्वबाद २१३ धावा :कर्णधार रोहित शर्मा ४८ चेंडूत ५३ धावा, तर केएल राहुलनं ४४ चेंडूत ३९ धावांचं योगदान दिलं. विराट कोहली १२ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालेजनं १० षटकात ४० धावा देत ५ गडी बाद केले. तर चारिथ असालंकानं ९ षटकात १८ धावा देत ४ विकेट घेतल्या.