हैदराबाद - भारतविरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी20 ( IND vs SL 1st T20 ) सामना लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअम वर खेळला जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मागील वर्षी शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तेव्हा संघाला टी20 सामन्यात 1-2 ने हार पत्करावी लागली होती. त्यातच आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हिशोब चुकता करायची संधी आहे.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान आतापर्यंत 22 आंतराष्ट्रीय टी20 सामने खेळण्यात आले आहे. ज्यात 14 वेळा भारतीय संघाने आणि 7 वेळा श्रीलंकेने बाजा मारली होती. मात्र, आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग दोन टी20 सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज या संघांचा समावेश आहे. त्यात सलग तिसऱ्यांदा श्रीलंकेला व्हाइटवॉश करण्यासाठी भारतीय संघ तयार आहे.
'हे' खेळाडू अनुपस्थितीत
भारतीय संघाचे सूर्यकुमार यादव, दीपक चहरस आणि केएल राहुल दुखापतग्रस्त झाले आहेत. तर माजी कॅप्टन विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना विश्रांती दिली आहे. यामुळे इशान किशनवर जबाबदारी वाढली आहे. तर सामन्यासाठी अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.