महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA T-20 Series : विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात - क्रिडाच्या बातम्या

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 9 जूनपासून दिल्लीत सुरू होत आहे. या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, इशान किशन आणि श्रेयस अय्यर उत्कृष्ट खेळ करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार ( India keeping world cup in mind ) आहे.

IND
IND

By

Published : Jun 8, 2022, 6:34 PM IST

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एक मजबूत संघ तयार करण्याच्या प्रयत्नात, भारत नव्या आणि जुन्या अशा दोन्ही खेळाडूंची चाचणी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध पाच टी-20 ( India vs South Africa T-20 Series )आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकेत घेणार आहे. भारताने आतापर्यंत सलग 12 सामने जिंकले आहेत आणि सलग 13 वा टी-20 सामना जिंकून नवा विक्रम रचण्याचाही प्रयत्न करेल.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुख्य उद्देश ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची तयारी करणे हा असेल. यासाठी दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला प्रतिस्पर्धी असू शकत नाही, ज्याने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असली तरी कर्णधार केएल राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये ( Captain KL Rahul in excellent form ) आहे. मात्र, रुतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांना सलामीचा जोडीदार म्हणून निवडणे त्यांच्यासाठी सोपे जाणार नाही. या दोघांनाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही, पण त्यांना लयीत परतण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे.

सूर्यकुमार यादवच्या ( Batsman Suryakumar Yadav ) अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते. पण चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या दीपक हुड्डाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण लखनौ सुपर जायंट्ससाठी त्याने तिसऱ्या क्रमांकावर प्रभावी कामगिरी केली होती. ऋषभ पंत आणि संघात पुनरागमन केलेला दिनेश कार्तिक मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. पंत आपला वेग पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करेल, तर कार्तिक आपला आयपीएल फॉर्म कायम ठेवू शकतो का हे पाहणे महत्वाचे असेल. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, परंतु तो येथे फिनिशरच्या भूमिकेत परतण्यास तयार असेल.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Head Coach Rahul Dravid ) म्हणाले, कधी कधी तुम्ही राष्ट्रीय संघात तीच भूमिका बजावता, जी तुम्ही तुमच्या फ्रँचायझी संघासाठी खेळता. पण कधी कधी भूमिका बदलते. भुवनेश्वर कुमार वेगवान विभागाचे नेतृत्व करेल, त्याच्यासोबत डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलही साथ देईल. विश्वचषकासाठी वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचीच निवड होण्याची खात्री असल्याने हे दोघेही आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. आवेश खान तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारणार आहे, मात्र तो कामी आला नाही तर अर्शदीप सिंग आणि उमरान मलिकला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.

युझवेंद्र चहल ( Spinner Yuzvendra Chahal ) आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी 2019 नंतर प्रथमच संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाची विश्वचषकासाठी निवड निश्चित मानली जात असून चहललाही वगळता येणार नाही. अशा स्थितीत रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि कुलदीप यांना दमदार कामगिरी करून आपला दावा मजबूत करावा लागेल.

दक्षिण आफ्रिकेने 2010 पासून भारतात मर्यादित षटकांची मालिका गमावलेली नाही आणि यावेळीही त्यांनी आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी उत्कृष्ट फॉर्मात असलेले डेव्हिड मिलर ( David Miller excellent form ), क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोलंदाजीत, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या फिरकी जोडीवर आणि कागिसो रबाडा आणि अॅनरिक नोर्किया या वेगवान जोडीवर त्याचे लक्ष असेल.

टी-20 मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढीलप्रमाणे -

भारत: केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुमार भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्केआ, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शमसी स्टब्स, रासी व्हॅन डेर ड्युसेन आणि मार्को यान्सेन.

हेही वाचा -Tennis Player Aishwarya Jadhav : विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची आशियाई संघात निवड

ABOUT THE AUTHOR

...view details