रांची : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज राजधानीच्या JSCA स्टेडियमवर खेळला जाणार ( (india vs south africa second one day match ) आहे. मालिकेतील या सामन्याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जेएससीए स्टेडियम या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
आताची अपडेट :
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करत सात षटकात 1 गडी गमावत 33 धावा केल्या आहेत.
क्विंटन डिकॉक हा 8 चेंडूत 5 धावा बनवून बाद झाला आहे. तर भारताकडून मोहमद सिराजने 1 गडी बाद केला आहे.
जानेमन मलान 24 चेंडूत 21 धावांवर खेळत आहे.
तर रिझा हेड्रिक्स 10 चेंडूत 5 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या विकेटसाठी दोघ फलंदाजांनी मिळून 30 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यासाठी राजधानी रांचीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सामन्यादरम्यान, शहरात चार आयपीएस, 20 डीएसपी, 40 पोलीस निरीक्षक, 84 पोलीस उपनिरीक्षक आणि 1500 जवान तैनात (security for India South Africa ODI cricket match) करण्यात आले आहेत.
पोलीस यंत्रणा अलर्टवर - भारत आणि दक्षिण क्रिकेट सामन्याच्या सुरक्षेसाठी पोलीस मुख्यालयातून 4 आयपीएस अधिकारी रांचीमध्ये तैनात करण्यात आले आहेत. सर्व आयपीएसना रांचीच्या वरिष्ठ एसपींसोबत समन्वय साधण्याची आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. इन्स्पेक्टर दरोगा आणि जमादार यांच्यासह एकूण 29 डीएसपी, 500 पोलीस अधिकारी स्टेडियमच्या आत आणि बाहेर सुरक्षेत गुंतले आहेत. याशिवाय स्टेडियमपासून मुख्य गेटपर्यंत आणि स्टेडियमच्या आजूबाजूला 1500 जवान तैनात करण्यात (1500 jawans deployed in security) आले आहेत.
हॉटेलमध्ये सुरक्षा कडक:भारत व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे खेळाडू रांची येथील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये थांबले आहेत. हॉटेलची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. हॉटेलच्या बाहेर आणि आत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या वेळी दोन्ही संघ विमानतळावरून हॉटेल आणि हॉटेल ते स्टेडियमवर जातील, त्या वेळी रांची पोलिसांचे स्नायपरही उंच इमारतीच्या वर तैनात असतील.
प्रवेशासाठी पास आवश्यक : रांचीचे वरिष्ठ एसपी किशोर कौशल यांनी पासबाबत माहिती दिली की, स्टेडियमभोवती ड्रॉप गेट्स बनवले आहेत. ज्यांच्याकडे पास किंवा तिकीट असेल, फक्त त्याच लोकांना या ड्रॉप गेट्समधून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. अन्यथा कोणत्याही व्यक्तीला पास किंवा तिकीटाशिवाय आत प्रवेश करण्याची परवानगी नाही.
दुसऱ्या विंगमधून डीएसपी नियुक्त : भारत दक्षिण आफ्रिका सामन्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी डीएसपी स्तरावरील 29 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रांची जिल्ह्यातील सामन्यासाठी पंधरा डीएसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. ZAP 7 DSP राजकुमार मेहता, PTC DSP हिरालाल रवी, विशेष शाखा DSP कुमार व्यंकटेश्वर रमण, ZAP 5 DSP अशोक कुमार सिंह, ZAP 8 DSP दीपक कुमार, ZAP 10 DSP आशुतोष कुमार सत्यम, जग्वार DSP कौशर अली, ज्ञानरंजन, SCRB DSP अनुदीप सिंह, IRB 3 DSP राम समद, ZAP 2 DSP मनोज कुमार महतो, CID DSP रणजित लाक्रा, ZAP 10 DSP तारामणी बखाला, सुमन गिरी नाग, IRB 9 DSP संजय कुमार यांना रांची जिल्हा दलात नियुक्त करण्यात आले आहे. सर्वांची प्रतिनियुक्ती 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान रांची जिल्हा दलात असेल.
पहिल्यांदाच आमने-सामने : 9 ऑक्टोबर रोजी रांची येथील JSCA स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे. रांचीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी या मैदानावर दोन्ही संघ कसोटी सामने खेळले होते.
तिसऱयांदा खेळविला जातोय एकदिवसीय सामना : रांचीमधील जेएससीए स्टेडियमवर तिसऱ्यांदा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात 2013 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा ७ विकेट्सने पराभव केला. हा सामना 19 जानेवारी 2013 रोजी झाला होता. दुसरा एकदिवसीय सामना 2019 मध्ये खेळला गेला. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने होता. हा सामना 8 मार्च 2019 रोजी झाला. यावेळी भारतीय संघाचा पराभव झाला होता.
जेएससीए स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने : एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त, रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय T20 सामने आणि दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना 2016 मध्ये 12 फेब्रुवारी 2016 रोजी खेळविण्यात आला. हा सामना भारत आणि श्रीलंका संघांमध्ये झाला. ज्यामध्ये भारतीय संघ विजयी झाला. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2019 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी टी-20 सामना झाला या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर या मैदानावर दोन कसोटी सामनेही खेळले गेले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च 2017 मध्ये पहिला कसोटी सामना तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑक्टोबर 2019 मध्ये दुसरा कसोटी सामना खेळला गेला. याशिवाय या स्टेडियममध्ये आयपीएलचे काही सामनेही खेळले गेले आहेत.