रांची- भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तब्बल ३ महिन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये दिसला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर रंगला होता. भारताने या सामन्यात एक डाव २०२ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने जिंकली. हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही हजेरी लावली होती. तो रांचीच्या कसोटीतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शाहबाज नदीमला खास कानमंत्र देताना दिसला. याचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे.
महेंद्रसिंह धोनी जुलै २०१९ मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यानंतर क्रिकेटपासून लांब आहे. त्याने सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि तो डिसेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकाच्या मालिकेतून संघात पुनरागमन करेल, अशी चर्चा आहे.
धोनीने सामन्यानंतर शाहबाज नदीम आणि संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. याचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहेत. त्या फोटोमध्ये धोनी, ब्लॅक टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे.