केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवशीय सामना आज पार ( Ind vs SA 3rd ODI ) पडला. अखेरच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे ( India Looses by South Africa ) लागले. पहिल्या दोन सामन्यातच भारताने मालिका गमावली होती. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने मालिका ( Africa Win 3-0 ODI ) जिंकली आहे.
नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यानंतर भारताने उत्तम गोलंदाजीचा नमूना दाखवत मलान, बावुमा आणि मार्करम या खेळाडूंना तंबुत माघारी पाठवले. मात्र, डी कॉक आणि ड्युसेन यांनी डाव सावरत 288 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. डी कॉकने 124 करत शतक तर, ड्युसेनने अर्धशतकी खेळी करत 52 धावा केल्या. मिलरनेही 39 धावांची पारी खेळली. भारतीय गोलंदजातील प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 3, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तसेच, युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली.