नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील अखेरचा आणि शेवटचा सामना इंदूर मध्यप्रदेश येथे सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू आहे. भारतीय संघाने अगोदरच मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. आज झालेल्या सामन्यात टीम इंडियाने किवींना 295 धावांवर रोखत 90 धावांनी विजय मिळवला. याबरोबर भारताने या मालिके न्यूझीलंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिली.
प्रथम फलंदाजी करताना भारताची दमदार सुरुवात :न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहीत शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. भारताची पहिली विकेट 26 षटकांत 180 वर पोहचवली आहे. कर्णधार रोहीत शर्माने 85 चेंडूत 101 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शुभमन गिलसुद्धा लवकर तंबूत परतला, त्याने 78 चेंडूत 112 धावांचा पाऊस पाडला. कोहली आपला जम बसवत असताना, जेकब डफीच्या गोलंदाजीवर फिन एलनद्वारा झेलबाद झाला. त्यानंतर हार्दीक पांड्यानेच अर्धशतकी खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. भारताने 9 गडी गमावून 385 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर भारताने 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय संघ विक्रम राखणार?:इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय संघाचा मोठा विक्रम आहे. आता यापुढेही टीम इंडिया हा विक्रम कायम राखू शकेल का, हे पाहावं लागेल. होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारताने अद्याप एकही वनडे सामना गमावलेला नाही. आता टीम इंडिया या मैदानावर आपला 6 वा वनडे सामना खेळणार आहे. या मैदानावर भारताने चमकदार कामगिरी करत 5 वनडे जिंकले होते. भारतीय संघाने 2006 मध्ये होळकर स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता आणि आता 2017 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यानंतर मंगळवारी 2023 मध्ये 6 वा एकदिवसीय सामना खेळला जाईल.
आतापर्यंत सर्व सामने जिंकलेले:इंदूरमधील टीम इंडियाची कामगिरी भारताने 2006 साली होळकर स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा 2008 मध्ये होळकर मैदानावर भारताचा सामना इंग्लंडशी झाला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर 54 धावांनी विजय मिळवला. 2011 मध्ये, भारताने होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळला आणि 153 धावांनी विजेतेपद पटकावले. 2015 मध्ये, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होळकर मैदानावर चौथा एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये भारताने 22 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर भारताने 5व्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा सामना केला आणि 5 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.
हेही वाचा: IND Vs NZ 3rd ODI Playing 11 भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना आज जाणून घ्या प्लेइंग ११ खेळपट्टी आणि हवामान अंदाज