महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2021, 7:20 PM IST

Updated : Nov 19, 2021, 10:57 PM IST

ETV Bharat / sports

INDvsNZ 2nd T20: भारताचा मालिका विजय.. दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव

IND VS NZ T20
IND VS NZ T20

22:50 November 19

भारताचा न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय

154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडी के. एल. राहुल व रोहित शर्माने अर्धशतके झळकावून विजयाचा पाय रचला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. के. एल राहुलने 49 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार व 2 षटकार ठोकले. कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडून 55 धावा केल्या. यामध्ये तब्बल 5 षटकार व एका चौकाराचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव केवळ एक धाव काढून बाद झाले. टीम साऊदीने त्याचा त्रिफळा उडवला. रिषभ पंत व व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी 12-12 धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केलेय पंतने निशामने टाकलेल्या 17 व्या षटकात दोन षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. 

21:10 November 19

20 षटकांत न्यूझीलंडच्या 6 बाद 153 धावा

2० षटकात न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेत उत्तम पदार्पण केले. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या.

21:10 November 19

न्यूझीलंडचा डाव

सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मार्टिन गप्टील व डॅरेल मिशेलने न्यूझीलंच्या डावाची सुरूवात केली. मार्टिन गप्टिलने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. दुसरीकडे डॅरिल मिशेल एकेरी धाव घेऊन स्ट्राईक गप्टीलकडे देत होता. या दोघांनी ४८ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज दीपक चहरने गप्टिलला झेलबाद केले. गप्टिलने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा टोकल्या. त्यानंतर मिशेलने मार्क चॅपमनसह संघाला सावरले. चॅपमन अक्षरचा बळी ठरला. आपला पहिला टी-20 सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलने मिशेलच्या (३१) रुपात आपला पहिला बळी घेतला. मिशेलने 28 चेंडूत 31 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सच्या ३४ धावांमुळे न्यूझीलंडला दीडशेपार जाता आले. एकवेळ वाटत होते ही न्यूझीलंड 180 धावांचा टप्पा ओलांडेल. मात्र शेवटच्या पाच षटकात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत न्यूझीलंडला २० षटकात ६ बाद १५३ धावांवर रोखले. शेवटच्या तीन षटकात न्यूझीलंडला पाच धावांच्या सरासरीने केवळ 15 धावा करता आल्या. भारताकडून हर्षल पटेलने 2 तर भुवनेश्वर, दिपक चहर, आर अश्विन व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

19:49 November 19

न्यूझीलंडला दुसरा धक्का मार्क चॅपमन बाद

9 व्या षटकात न्यूझीलंडला दुसरा धक्का मार्क चॅपमन च्या रुपात बसला. चॅपमनने 17 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चहरने त्याचा झेल टिपला.

19:48 November 19

गप्टीलने मोडला विराट कोहलीचा विश्वविक्रम

विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (3227) धावा केल्या आहेत आणि मार्टिन गुप्टिलने सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्याला मागे टाकले आहे. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

19:46 November 19

न्यूझीलंडला पहिला धक्का.. गप्टील बाद, 6 षटकात 64 धावा

न्यूझीलंडची धावसंख्या 6 ओव्हरपर्यंत 1 गडी गमावून 64 धावा आहे. गप्टीलने 15 चेंडूत धुवाधार 31 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार व 3 चौकरांचा समावेश आहे. दिपक चहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने त्याचा झेल टिपला.

19:15 November 19

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आजच्या सामन्यातही रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात मैदानावर पडणाऱ्या दवामुळे गोलंदाजी करताना समस्या येणार आहेत. 

19:14 November 19

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन -

भारत -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल.

न्यूझीलंड -

मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट ( यष्टिरक्षक ), जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

18:31 November 19

INDvsNZ 2nd T20 Match : नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

रांची - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज रांचीमध्ये खेळवला जात आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तीन टी-20 सामन्यांची मालिका विजयाची संधी आहे. भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. टीम इंडियाला नवा टी-२० कर्णधार रोहित शर्मा आणि नवा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात विजयाने केली आहे. त्यांचे आता लक्ष्य मालिका विजयाचे असणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या संघाला मालिकेच बरोबरी साधायची आहे. 

Last Updated : Nov 19, 2021, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details