कानपूर - भारत व न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवशी भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. रिद्धिमान साहा व श्रेयस अय्यर यांनी दमदार अर्धशतके ठोकली. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा दुसरा डाव सात बाद 234 धावांवर घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली असून टॉम लॅथम आणि विल यंग यांनी सलामी दिली. मात्र फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला (२) पायचीत पकडले. यंगनंतर नाईट वॉचमन विल सोमरविले मैदानात आला आहे. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १ बाद ४ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी पाहुण्या संघाला २८० धावा कराव्या लागणार आहेत.
IND vs NZ, 1st Test Day 4: भारताचा दुसरा डाव घोषित.. न्यूझीलंडला शेवटच्या दिवशी 280 धावांची गरज
भारत व न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवशी भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर रिद्धिमान साहा व श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनी भारतीय डाव सावरला. न्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज आहे व त्यांच्याकडे 9 विकेट शिल्लक आहेत.
भारताची आघाडीची फळी पूर्णपणे ध्वस्त झाल्यानतंर मधल्या फळीने सावध खेळ करत भारताला चांगली धावसंख्या उभारुन दिली. भारताकडून श्रेयस अय्यरने 65 धावा केल्या तर साहाने 61 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय अक्षर पटेल (28) आणि आर. अश्विन (32) यांनी झुंझार खेळ केला.
तत्पूर्वी भारताने न्यूझीलंडला तिसऱ्या दिवशी 296 धावांवर रोखल्यानंतर आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताचा सलामीवीर शुभमन गिल केवळ एक धाव काढून तंबूत परतला होता. गिल माघारी परतल्यानंतर तिसऱ्या दिवसातील अंतिम सत्र मयंक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांनी खेळून काढले होते. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच भारताला एका पाठोपाठ एक धक्के बसले. पुजारा (22), रहाणे (4), मयंक अग्रवाल (17) आणि रविंद्र जडेजा शुन्य धावांवर बाद झाल्याने भारतील फलंदाजी कोसळली. दिवसाचा खेळ संपण्यास काही अवधी शिल्लकअसताना रहाणेने भारताचा डाव सात बाद 234 धावांवर घोषित केला व न्यूझीलंडला शेवटची काही षटके फलंदाजीसाठी पाचारण केले.