महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind Vs Ban 2016 T20 Match : उसेन बोल्टपेक्षाही वेगाने धावला होता धोनी! पांड्याने शेवटच्या 3 चेंडूत 3 विकेट घेत पलटवला पूर्ण सामना! - भारत आणि बांगलादेश 2016 टी 20 सामना

23 मार्च 2016 रोजी भारताने एका रोमांचक सामन्यात बांगलादेशच्या जबड्यातून सामना हिसकावून अविस्मरणीय विजयाची नोंद केली. या सामन्यात धोनीने शेवटच्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद करण्यासाठी विश्वविक्रमी धावपटू उसेन बोल्टपेक्षाही वेगाने धाव घेतली होती.

Ind Vs Ban 2016 T20 Match
भारत विरुद्ध बांगलादेश टी 20

By

Published : Mar 24, 2023, 9:14 AM IST

नवी दिल्ली :बरोबर 7 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध असा रोमांचक सामना खेळला होता, ज्याच्या आठवणी आजही लोकांच्या हृदयात ताज्या आहेत. 23 मार्च 2016 रोजी, भारत आणि बांगलादेश यांच्यात टी 20 विश्वचषकातील 25 वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 गडी गमावून 146 धावा केल्या. तर बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी 20 षटकांत 9 गडी बाद करत 145 धावांत रोखले. अशा प्रकारे भारताने अवघ्या 1 धावाने हा सामना जिंकला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात सलग तीन चेंडूत तीन विकेट घेत भारताने सामना आपल्या नावे केला.

भारताची प्रथम फलंदाजी : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला 20 षटकात 7 गडी गमावून अवघ्या 146 धावा करता आल्या. भारताकडून सुरेश रैनाने 23 चेंडूत 30 धावा, विराट कोहलीने 24 चेंडूत 24 धावा आणि शिखर धवनने 22 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. मात्र इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अशाप्रकारे भारताने बांगलादेशला 202 षटकांत 147 धावांचे लक्ष्य दिले.

6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात काही खास झाली नाही. त्यांची पहिली विकेट 11 धावांवर पडली. मात्र त्यानंतर तमीम इक्बाल (32 चेंडूत 35 धावा) आणि सब्बीर रहमान (15 चेंडूत 26 धावा) यांनी चांगली भागीदारी करून सामन्यात पुनरागमन केले. त्याचवेळी शकीब अल हसनने (15 चेंडूत 22 धावा) धमाकेदार खेळी करत बांगलादेशला विजयाच्या समीप पोहचवले. बांगलादेशकडून सौम्या सरकारने 21 धावांचे योगदान दिले. 19 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या 6 गडी गमावून 136 धावा एवढी होती. त्यांना अखेरच्या 6 चेंडूत विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. महमुदुल्लाह (18) आणि मुशफिकुर रहीम (11) हे दोन भरवशाचे फलंदाज क्रीझवर खेळत होते. तर भारताकडून शेवटच्या षटकाची कमान नवख्या हार्दिक पांड्याकडे होती.

  • पहिला चेंडू - महमुदुल्लाहने एक धाव घेतली.
  • दुसरा चेंडू - मुशफिकुरने कव्हरवर शानदार चौकार मारला.
  • तिसरा चेंडू - फाइन लेगवर चौकार मारून मुशफिकुरने बांगलादेशचा विजय जवळपास निश्चित केला. आता बांगलादेशला 3 चेंडूत केवळ 2 धावांची गरज होती.
  • चौथा चेंडू -मुशफिकुरने या चेंडूवर मोठा शॉट खेळला, पण डीप मिडविकेटवर धवनने त्याचा झेल घेतला. आता 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या.
  • पाचवा चेंडू - महमुदुल्लाह स्ट्राइकवर, पंड्याने ओव्हरचा पाचवा चेंडू फुल टॉस टाकला. महमुदुल्लाहने कव्हरवर हवाई शॉट खेळला मात्र रविंद्र जडेजाने चपळाईने डायव्ह करत त्याचा सुरेख झेल घेतला. आता बांगलादेशला 1 चेंडूत 2 धावांची गरज होती.
  • शेवटचा चेंडू - आता पांड्यासमोर नुकताच क्रिजवर आलेला शुवगत होम होता. पांड्याने त्याला बाउन्सर टाकला, जो तो खेळू शकला नाही. तरीही त्याने धावायला सुरुवात केली. यावेळी यष्टिरक्षक धोनीने वेगाने चेंडू गोळा करत मुशफिकरला चित्याच्या चपळाईने धावबाद केले. अशाप्रकारे भारताने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा एका धावेने पराभव केला.

हेही वाचा :UK PM Rishi Sunak Plays Cricket : यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक उतरले क्रिकेटच्या मैदानात

ABOUT THE AUTHOR

...view details