Update :
श्रीलंकेची भारतावर मात; मालिकेत साधली बरोबरी
दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने झुंजार खेळ करत भारताला ४ विकेटने मात दिली आहे. या विजयासह यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. भारताच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. पण धनंजय डि सिल्वाने केलेल्या चिवट खेळीमुळे श्रीलंकेला हा विजय साकारता आला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या डावाला सुरुवात झाली असून ऋतुराज गायकवाड आणि शीखर धवन ओपनर बॅट्समन म्हणून मैदानात उतरले आहेत.
यापूर्वी 25 तारखेला झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता.