मुंबई - भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्याआधी खेळाडू मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. या दरम्यान, खेळाडू जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळाले. आता खेळाडूंचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ खेळाडूंची आवडती डिश कशी तयार होते, याची माहिती देण्यात येत आहे.
बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय संघातील खेळाडूंची आवडती डिश कशी तयार होते हे दाखवलं जात आहे. त्या डिशचे नाव आहे 'मॉक डक'. श्रीलंका दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेला शिखर धवन याने या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. ही डिश सध्या बनवली जात आहे. ही माझी आवडती डिश असल्याचे तो सांगतो.
मुंबईतील ग्रँट हयात हॉटेलमधील शेफ यानंतर हॉटेलच्या किचनची सहल घडवतात. त्याचबरोबर ही डिश कशी तयार होते, याची माहिती देखील ते देतात. धवनसह यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची ही सर्वात आवडती डिश आहे. याशिवाय हार्दिक आणि कृणाल पांड्याने आठवडाभरात तीन ते चार वेळा या डिशची ऑर्डर केल्याची माहिती त्यांनी दिली.
भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान, भारताचा दुसरा संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले असून या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. चेतन सकारीया, देवदत्त पड्डीकल, नितिश राणा अशा बऱ्याच खेळाडूंचा हा पहिलाच दौरा आहे.
असा आहे भारताचा श्रीलंका दौरा