सिडनी - टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल अपयशी ठरला. त्याच्या ४ षटकात ५१ धावा फटकावल्या गेल्या. असे असले तरी, त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा -माजी कर्णधार सरफराज अहमदचे पाक संघात पुनरागमन
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लेगस्पिनर चहलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चहलने एक गडी बाद केला. त्यामुळे बुमराह आणि चहल टी-२०मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. बुमराह आणि चहल यांच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५९ विकेट्स आहेत.