महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅविस हेडला कर्णधारपद

या संघात ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन आणि सलामीवीर जो बर्न्स देखील आहेत. मात्र, या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व ट्रॅविस हेड करणार आहे. कॅमेरून ग्रीनलाही संघात जागा मिळाली आहे.

travis head to lead australia a against india
सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅविस हेडला कर्णधारपद

By

Published : Dec 5, 2020, 3:06 PM IST

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने भारत-अ संघाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी १३ सदस्यीय ऑस्ट्रेलिया-अ संघ जाहीर केला आहे. हा तीन दिवसीय सामना रविवारी ड्रममोने ओव्हल मैदानावर सुरू होईल.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघात लायनचा समावेश, 'या' खेळाडूला केले 'रिप्लेस'

या संघात ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन आणि सलामीवीर जो बर्न्स देखील आहेत. मात्र, या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व ट्रॅविस हेड करणार आहे. कॅमेरून ग्रीनलाही संघात जागा मिळाली आहे.

ट्रॅविस हेड

६ ते ८ डिसेंबर दरम्यान होणारा हा सराव सामना ऑस्ट्रेलियाच्या कसोटीपटूंसाठी चांगला पर्याय ठरणार आहे. उभ संघांत चार सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. १७ डिसेंबरला अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात येईल.

टिम पेन

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला कसोटी सामना - १७ ते २१ डिसेंबर (अ‌ॅडलेड)
  • दुसरा कसोटी सामना (बॉक्सिंग डे ) - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
  • तिसरा कसोटी सामना - ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२१ (सिडनी)
  • चौथा कसोटी सामना - १५ जानेवारी ते १९ जानेवारी (गाबा)

ऑस्ट्रेलिया-अ संघ : ट्रॅविस हेड (कर्णधार), जॅक्सन बर्ड, जो बर्न्स, हॅरी कॉनवे, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, निक मॅडिसन, मिचेल नासर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्स्की, मार्क स्टीटी, विल सुदरलँड.

ABOUT THE AUTHOR

...view details