सिडनी -भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया संघात दाखल होणार आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून पहिला सामना अॅडलेड ओव्हलवर पार पडणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येईल.
हेही वाचा -दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''टीम इंडिया सर्व सामने हरणार''
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या समावेशाचे वृत्त दिले आहे. टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे स्टार्कने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ''स्टार्कने ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला सांगितले आहे की, अॅडलेडमध्ये तो पुन्हा संघात सामील होण्यास तयार आहे. ऑस्ट्रेलियाच्या 'अ' संघासह तो सिडनीहून ऑस्ट्रेलियाला जाईल'', असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.
संघाचे सदस्य सीन एबॉट, जो बर्न्स, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस आणि मिशेल स्वेप्सन यांच्यासह स्टार्क स्टार्क चार्टर्ड विमानाने सिडनीवरून निघणार आहे. ३० वर्षीय स्टार्कला पहिल्या कसोटीच्या तयारीसाठी दोन दिवस मिळतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, आम्ही या कठीण काळात स्टार्कबरोबर होतो. आम्हाला आनंद आहे की, त्याने आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवला. आम्ही सोमवारी त्याचे स्वागत करण्यास तयार आहोत.
दिवस-रात्र कसोटीच्या प्रकारात स्टार्कचा आलेखा उंचावता राहिला आहे. त्याने अशा सात सामन्यांत ४२ बळी घेतले आहेत.