नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या प्रवेशामुळे भारताची फलंदाजी आणखी भक्कम होणार आहे. सिडनीमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सरस कामगिरी झाल्याने संघाचा आत्मविश्वास वाढला असून त्याचा फायदा येत्या सामन्यात दिसेल, असे रोहित शर्माचे पूर्वीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत आहे. 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना लाड रोहितच्या सुधारित फलंदाजीच्या तंत्राविषयी, त्याने कोणत्या गोलंदाजापासून सावध असले पाहिजे आणि आगामी कसोटीत भारताच्या संभाव्यतेविषयी बोलले.
मुलाखत -
प्रश्न - तिसर्या कसोटीत तुम्ही भारताचे मूल्यांकन कसे कराल?
उत्तर - तिसर्या कसोटीबद्दल मी नक्कीच सकारात्मक आहे. पहिल्या सामन्यात नामुष्कीजन 36 धावा करून सर्वबाद झालेल्या संघाने दुसऱ्या सामन्यात चांगले पुनरागमन केले. खरोखरच उत्तम कामगिरी राहिली. दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली फलंदाजी करणे एक मोठी गोष्ट आहे. आता रोहितला संघात स्थान देण्यात आले आहे. उमेश जखमी झाला असला तरी सैनी आणि शार्दुलसारखे आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. मला वाटते की आम्ही योग्य मानसिकतेत आहोत आणि ऑस्ट्रेलियावर खूप दबाव आहे.
प्रश्न - शीर्ष क्रमांकावर असलेले भारतीय फलंदाज आतापर्यंत मालिकेत अपयशी ठरले आहेत. पृथ्वी शॉची खराब कामगिरी, मयांक अग्रवाल अजूनही चाचपडत आहे. दुसरीकडे शुभमन गिलने अपवादात्मक कामगिरी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता रोहित शर्माची कामगिरी कशी असे आणि तुमच्या मते त्याने कोठे फलंदाजी करावी?
उत्तर - मला वाटते की त्याने सलामीच्या ठिकाणीच फलंदाजी केली पाहिजे आणि मला खात्री आहे की संघ व्यवस्थापन त्याच धर्तीवर विचार करीत आहे. सलामीला रोहितने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खरोखर चांगली फलंदाजी केली. रोहितने बर्याच वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीत शानदार कामगिरी केली आहे. त्याचा समावेश सलामीमध्ये असायला हवा. सीडनीच्या खेळपट्टीवर शुभमनने चांगली फलंदाजी केली असल्याने मला वाटते रोहित तिसर्या कसोटीत मयांकची जागा घेईल.
प्रश्न - डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना करताना रोहितची कामगिरी खराब राहिली आहे. तुम्हाला वाटते का की त्याच्याकडे मिशेल स्टार्क विरूद्ध विशेष रणनीती असेल?
उत्तर - रोहितच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना तो आता आरामात करू शकतो. तो चेंडू फार लवकर उचलतो आणि आता सहजतेने हाताळतो. मला वाटत नाही त्याला डावखुऱ्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी फार कष्ट करावे लागेल.