ब्रिस्बेन -भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. शार्दुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली धाव एका षटकारासह पूर्ण केली. ब्रिस्बेनमध्ये चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा कारनामा केला. अशी कामगिरी करणारा शार्दुल हा भारताचा दुसरा आणि जगातील तेरावा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियातील सिराजची कामगिरी पाहून सचिन खुश, म्हणाला...
शार्दुलच्या आधी रिषभ पंतने भारतासाठी ही कामगिरी केली होती. पंतने २०१८च्या इंग्लंड दौर्यावर षटकार खेचत कसोटीत पहिली धावा घेतली. आता या यादीत २९ वर्षीय शार्दुल ठाकुरचेही नाव जोडले गेले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याने जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सच्या चेंडूवर हा षटकार ठोकला.
शार्दुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा अर्धशतकांसह १२३२ धावा केल्या. ८७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्रिस्बेनमध्ये शार्दुलने ९ चौकार आणि २ षटकारासंह ६७ धावा केल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांसह खाते उघडणारे खेळाडू -
- एरिक फ्रीमॅन (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध भारत, १९६८.
- कार्लिले बेस्ट (वेस्ट इंडीज) वि इंग्लंड, १९८६.
- कीथ डाबेन्गवा (झिम्बाब्वे) वि न्यूझीलंड, २००५.
- डेल रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) वि बांगलादेश, २००९.
- शफिउल इस्लाम (बांगलादेश) विरुद्ध भारत, २०१०
- जहरुल इस्लाम (बांगलादेश) विरुद्ध इंग्लंड, २०१०
- अल अमीन हुसेन (बांगलादेश) विरुद्ध न्यूझीलंड, २०१३.
- मार्क क्रेग (न्यूझीलंड) वि वेस्ट इंडीज, २०१४.
- धनंजया डी सिल्वा (श्रीलंका) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१६.
- कमरुल इस्लाम रब्बी (बांगलादेश) विरुद्ध इंग्लंड, २०१६.
- सुनील आंब्रिस (वेस्ट इंडीज) वि न्यूझीलंड, २०१७.
- रिषभ पंत (भारत) विरुद्ध इंग्लंड, २०१८.
- शार्दुल ठाकुर (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२०.