महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुन्हा संकट..! नवदीप सैनीला दुखापत

आपले वैयक्तित आठवे षटक टाकत असताना नवदीपच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे सैनीच्या षटकातील उर्वरित १ चेंडू रोहित शर्माने टाकला. सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले आहे, की सैनी त्याच्या मांडीमध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार करत आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे.

indian pacer Navdeep Saini has complained of pain in his groin.
पुन्हा संकट..! नवदीप सैनीला दुखापत

By

Published : Jan 15, 2021, 12:28 PM IST

ब्रिस्बेन - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून चौथ्या कसोटीला सुरुवात झाली. गाबाच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक गोष्टी घडल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण. हे ग्रहण अजून वाढण्याची शक्यता समोर आली आहे. गाबा कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनीला दुखापत झाली आहे.

हेही वाचा - ''बाबरवर एफआयआर दाखल करा'', लाहोर न्यायालयाचा आदेश

आपले वैयक्तित आठवे षटक टाकत असताना नवदीपच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे सैनीच्या षटकातील उर्वरित १ चेंडू रोहित शर्माने टाकला. सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले आहे, की सैनी त्याच्या मांडीमध्ये वेदना जाणवत असल्याची तक्रार करत आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे.

सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने आणि अश्विनला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्यांनाही या कसोटीतून बाहेर पडावे लागले.

या सर्वांआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details