मेलबर्न -भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात मोठा पराक्रम केला आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत सिराजने ५ बळी घेतले. यासह तो गेल्या ७ वर्षात ५ बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा -ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार
या सामन्यात शुबमन गिलबरोबर पदार्पण करणाऱ्या सिराजने दोन्ही डावांमध्ये एकूण ३६.३ षटके टाकत पाच विकेट घेतल्या. यामध्ये दोन्ही डावात कॅमेरून ग्रीनच्या विकेटचा समावेश आहे. या व्यतिरिक्त सिराजने पहिल्या डावात मार्नस लाबुशेनला बाद केले. दुसर्या डावात सिराजने ग्रीन व्यतिरिक्त ट्रेव्हिसड हेड आणि नाथन लायनची विकेट घेतली.
सिराजच्या आधी नोव्हेंबर २०१३मध्ये भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद शमीने पाच बळी घेतले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शमीने नऊ गडी बाद केले. गमतीची गोष्ट म्हणजे या सामन्यात मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे सिराजला संधी मिळाली.
तत्पूर्वी, रविचंद्रन अश्विनने २०११ मध्ये पदार्पण करताना वेस्ट इंडीज विरुद्ध दिल्लीत नऊ गडी बाद केले होते.