सिडनी -ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा घातक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या उर्वरित टी-२० सामन्यांमधून माघार घेतली आहे. यामागे त्याने आपले वैयक्तिक कारण दिले आहे. सिडनी येथे भारताविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करुन यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा -चेतेश्वर पुजाराही वर्णभेदाचा बळी? माजी कर्णधाराने केला खुलासा
शनिवारी जेव्हा संघ कॅनबेराहून सिडनीला पोहोचला तेव्हा त्याने वैयक्तिक कारण सांगून संघाच्या बायो-बबलमधून 'एक्झिट' घेतली. मात्र, तो संघात कधी सामील होणार, हे समजू शकले नाही. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अॅडलेडमध्ये १७ डिसेंबर रोजी खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, "जगातील कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही, तेच मिचसाठी आवश्यक आहे. आम्ही मिचला भेटलो. तो त्याला पाहिजे तितका वेळ घेईल.
"स्टार्कने भारताविरुद्धचा तिसरा वनडे सामनाही खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायला संघात स्थान मिळू शकेल. जर त्याला जागा मिळाली तर, तो दोन वर्षानंतर आपल्या देशासाठी टी-२० खेळेल. अन्यथा डॅनियल सॅम्स संघात पदार्पण करेल.