सिडनी -भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अॅडलेड येथे झालेली पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तर, दुसरी कसोटी भारताने जिंकली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
हेही वाचा - IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना
दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीला मुकलेले डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्स्की या सामन्यात सलामीला येत टीम इंडियाच्या गोलंदाजीचा सामना करतील. तर, भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये उपकर्णधार रोहित शर्मा आणि नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे. नवदीप सैन या सामन्यातून कसोटी पदार्पण करेल. तर मोठ्या विश्रांतीनंतर रोहित मैदानात दिसणार आहे. पहिल्या दोन सामन्यात खराब कामगिरी करणारा सलामीवीर मयांक अगरवालला संघातून वगळण्यात आले आहे.