महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार दुसरा टी-२० सामना - भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा टी-२० सामना

ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतीमुळेही चिंतेत आहे. डेव्हिड वॉर्नर आधीच मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या टी-२० सामन्यामध्ये कर्णधार आरोन फिंचला इजा झाली. जर फिंच खेळत नसेल तर यजमान संघाला हा मोठा धक्का असेल. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाईत आपल्या विकेट्स गमावल्या.

india vs australia second t20i match
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार दुसरा टी-२० सामना

By

Published : Dec 6, 2020, 11:59 AM IST

सिडनी -भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाईल. पुन्हा एकदा एससीजीची खेळपट्टी फलंदाजांना उपयुक्त ठरणार असून, येथे होणाऱ्या शेवटच्या दोन टी-२० सामन्यातही मोठी धावसंख्या उभारण्याकडे दोन्ही संघाचे लक्ष असेल.

हेही वाचा -आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार दुसरा टी-२० सामना

ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतीमुळे चिंतेत आहे. डेव्हिड वॉर्नर आधीच मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या टी-२० सामन्यामध्ये कर्णधार आरोन फिंचला इजा झाली. जर फिंच खेळत नसेल तर यजमान संघाला हा मोठा धक्का असेल. दुसऱ्या सामन्याला काही अवधी बाकी असताना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही मालिकेबाहेर पडला आहे.

दुसरीकडे, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा या फलंदाजांव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात निराशा केली. जडेजाचा बदली खेळाडू म्हणून युझवेंद्र चहलने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे आज चहलला प्राधान्य मिळेल. चहल व्यतिरिक्त टी. नटराजननेही पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी बजावली होती.

दोन्ही संघ -

भारत - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन.

ऑस्ट्रेलिया - आरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (उपकर्णधार), नाथन लायन, जोश हेझलवुड, मोझेस हेन्रिक्‌स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, अँड्र्यू टाय, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.

ABOUT THE AUTHOR

...view details