सिडनी -कोरोनाच्या सावटाखाली परदेशात आयपीएल स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेनंतर भारतीय संघ आजपासून (शुक्रवार) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली एकदिवसीय मालिका खेळतो आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत दमदार धावा चोपल्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
भारतीय गोलंदाजांच्या नावावर लाजिरवाण्या कामगिरीची नोंद - भारत वि. ऑस्ट्रेलिया लेटेस्ट न्यूज
अलीकडच्या काळात भारतीय गोलंदाज एकदिवसीय सामन्यात पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यास अपयशी ठरले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियासह सिडनी क्रिकेट मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे. पॉवरप्ले दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने ५१ धावा केल्या. सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाज एकदिवसीय सामन्यात पॉवरप्ले दरम्यान विकेट घेण्यास अपयशी ठरले आहेत.

यापूर्वीच्या न्यूझीलंडबरोबरच्या तीन सामन्यांच्या मालिकेतही भारताला पॉवरप्लेमध्ये एकही विकेट मिळवता आलेली नव्हती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पॉवरप्ले १० षटकांचा असतो. जास्तीत जास्त दोन क्षेत्ररक्षक ३० यार्ड रेषेच्या बाहेर राहू शकतात. अशा परिस्थितीत फलंदाजांना धावा करण्याची चांगली संधी असते.