मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या सामन्याचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. परंतु त्यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपण अजिंक्यचे कौतुक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सामना संपल्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळाचे विश्लेषण करताना गावसकर बोलत होते.
कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी नाही -
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत आश्वासक सुरुवात केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 195 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालच्या मोबदल्यात १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपल्या नेतृत्त्वाची झलक दाखवत गोलंदाजीत बदल केले. तसेच त्याने कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी दिली नाही. अजिंक्यच्या या आश्वासक नेतृत्वानंतरही माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपण अजिंक्यचे कौतुक करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तर आरोप माझ्यावर करण्यात येईल -