अॅडलेड -ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे दिवस-रात्र कसोटीत न खेळल्यामुळे निराश आहे. मात्र, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्यास सक्षम होईन, असा विश्वास वॉर्नरने व्यक्त केला आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात ३४ वर्षीय वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तिसऱ्या एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांच्या टी-२० मालिकेला मुकला होता.
वॉर्नरला खेळायचाय 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना
वॉर्नर म्हणाला, "मला आशा आहे की, मला (बॉक्सिंग डे टेस्ट) यामधून बाहेर व्हायचे नाही. दुखापतीमुळे मी पहिल्यांदाच कसोटीतून बाहेर पडलो असल्याने मी निराश आहे. ही एक मोठी मालिका आहे, कसोटी सामन्यात न खेळणे निराशाजनक आहे. जे खेळाडू मैदानात आहेत, ते आता सर्वोत्तम कामगिरी करतील."

वॉर्नर म्हणाला, "आम्हाला आशा आहे की, आम्ही मालिकेत चांगली सुरुवात करू. मी वेगात धावू शकतो, अशी मला आशा आहे. मी सध्या ताशी १४ किमी वेगाने धावतो आहे, म्हणून पुढच्या आठवड्यात मला ताशी २६ ते ३० किमी वेगाने काम करावे लागेल." बॉक्सिंग डे कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.