हैदराबाद - टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्रींनी कोविड-19 विरुद्ध सुरू देशाच्या लढाईला आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकाहून मोठी लढाई म्हटले आहे. शास्त्रींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीपुढे संकट उभे केले आहे. कोविड-19 महामारीवर विजय मिळवणे विश्वचषकावर नाव कोरण्यासारखी दैदिप्यमान कामगिरी ठरेल.
मोठ्या लढाईसाठी आपले सर्वस्व पणाला लावले जाते. आपल्यासमोर जे कोरोनाचे आव्हान आहे, ते सर्वसाधारण विश्वचषकासारखे नाही. हे आव्हान आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकाहून मोठे आहे. या मुकाबल्यासाठी केवळ ११ लोक मैदानात नाहीत तर एक अब्ज ४० कोटी लोक मैदानात उतरले आहेत. तर मित्रांनो चला.. एक अब्ज ४० कोटी लोक एकत्र येऊन या कोरोनाला हरवू व मानवतेचा विश्वचषक जिंकू.