मेलबर्न -अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्याचा पराभवाचा बदला भारताने मेलबर्नवर घेतला. या कसोटीत अजिंक्यने नेतृत्वासोबत कर्तृत्वही सिद्ध केले. पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतलेल्या विराट कोहलीने अजिंक्य आणि टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा -YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
विराट म्हणाला, ''हा एक रोमांचक विजय आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. विजयाकडे वाटचाल केलेल्या संघासाठी आणि विशेषत: अजिंक्यसाठी मी खूप आनंदी आहे.'' अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले.