मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान १५० बळी घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी पेनने ही कामगिरी केली. सामन्याच्या ६०व्या षटकात रिषभ पंतचा झेल घेत त्याने हा पराक्रम केला.
हेही वाचा -भारतीय ग्रँडमास्टर हरिकृष्णाची जगज्जेत्या कार्लसनसोबत बरोबरी
३६ वर्षीय पेनने यष्टीरक्षक म्हणून केवळ ३३ डावात कसोटी क्रिकेटमध्ये १५० बळी पूर्ण केले आहेत. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकला ३४ डावांमध्ये ही कामगिरी करता आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने ३६ डावांमध्ये हा पराक्रम केला होता.