महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, पण टी-20 मालिका स्थगित - टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्याचवेळी चार सामन्यांची टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल, असे जय शाह यांनी सांगितले आहे.

Jay Shah
जय शाह

By

Published : Dec 4, 2021, 1:23 PM IST

नवी दिल्ली -ओमायक्रॉन या घातक व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन ( Omicron Impact On India's South Africa Tour ) विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआयने मोठे विधान केले आहे. तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. मात्र, दौऱ्याचा मूळ भाग असलेले 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका नंतर आयोजित केली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह ( Jay Shah On South Africa Tour ) यांनी सांगितले.

भारताचा हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ओमायक्रॉनमुळे हा दौरा पुढे ढकलला जाईल किंवा रद्द केला जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु बीसीसीआयने काही बदल करुन हा दौरा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्याचवेळी चार सामन्यांची टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल, असे जय शाह यांनी सांगितले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून आणि तिसरी सामना ३ जानेवारीला होणार आहे. तर, एकदिवसीय मालिकेतील सामने 11, 14 आणि 16 जानेवारी रोजी होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details