कोलंबो- श्रीलंका क्रिकेट संघाचे डेटा विश्लेषक जीटी निरोशनची भारत विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशाच्या क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली. त्याच्या अगोदर, फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना गुरुवारी विषाणूचा संसर्ग झाला होता आणि कोविड चाचणी पॉझिटिव्ह येण्याची ही दुसरी घटना आहे.
भारत श्रीलंका क्रिकेट मालिका चार दिवस लांबणीवर - भारत श्रीलंका क्रिकेट मालिका चार दिवस लांबणीवर
श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या वनडे सीरीजच्या वेळपत्रकात बदल करण्यात आली आहे. ही मालिका चार दिवस उशीराने सुू होणार असल्याचे समजते. नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिध्द होईल.
श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या वनडे सीरीजच्या वेळपत्रकात बदल करण्यात आली आहे. त्यासोबतच टी20 सामने देखील पुढे ढकलण्यात आले आहेत. 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु आता दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिध्द होईल.
हेही वाचा - क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने कृष्णप्पा गौतमला दिले मराठीचे धडे