महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फिरकीपटू कुलदीप यादववर यशस्वी शस्त्रक्रिया; सांगितलं कशावर करणार आता फोकस - कुलदीप यादव शस्त्रक्रिया न्यूज

कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या सराव सत्रात कुलदीप यादवच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता कुलदीपच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलदीप यादवने याची माहिती दिली.

india-spinner-kuldeep-yadav-undergoes-successful-surgery
फिरकीपटू कुलदीप यादववर शस्त्रक्रिया यशस्वी, सांगितलं कशावर करणार फोकस

By

Published : Sep 29, 2021, 5:09 PM IST

मुंबई - गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातून माघार घेत कुलदीप यादव भारतात परतला होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलदीप यादवने याची माहिती दिली. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या सराव सत्रात कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

कुलदीपने आज बुधवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्वत:चा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रिकव्हरीचा प्रवास सुरू झाला आहे. पाठिंब्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आता माझे फोकस रिहैबिलिटेशन प्रक्रिया, चांगल्या प्रकारे पूर्ण करून मैदानावर वापसी करण्यावर असेल.

कुलदीप यादवच्या पोस्टवर फॅन्ससह काही क्रिकेटर्संनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यात भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने कमेंट केली आहे. तो म्हणतो की, लवकर तंदुरूस्त हो भाऊ. लवकरच भेटू. युझवेंद्र चहलने देखील कमेंट केली असून त्याने लवकर बरा हो लहान भाऊ, असे म्हटलं आहे.

दरम्यान, 26 वर्षीय कुलदीप यादव मागील काही दिवसांपासून फॉर्मात नाही. त्याने मागील वर्षात फक्त 5 सामने खेळली असून यात त्याला फक्त एक गडी बाद करता आला आहे. त्याने भारतासाठी अखेरचा सामना याच वर्षी जुलै महिन्यात श्रीलंकाविरुद्ध खेळला होता.

कुलदीपने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्याने भारतासाठी 7 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळली आहेत. यात त्याने एकूण 174 गडी बाद केले आहेत. कुलदीप आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. परंतु त्याला आयपीएल 2021 मध्ये अंतिम संघात स्थान मिळवण्यात अपयश आले.

हेही वाचा -लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर

हेही वाचा -AUSW vs INDW: गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही; डे नाइट कसोटीआधी अस का म्हणाली मिताली

ABOUT THE AUTHOR

...view details